पंढरपूर प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती डाॅ श्याम कुलकर्णी यांनी दिली.
या कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डाॅ. स्वानंद कुलकर्णी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी, प्रा. ऋषिकेश देशपांडे याच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डाॅ. श्याम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, १० वर्षांतील शैक्षणिक वर्षांत आपण महाविद्यालयास खुप साथ दिली. नुकतेच आपल्या महाविद्यालयाला नॅक ए प्लस मानांकान प्राप्त करण्यात आला खुप महत्वाचा वाटा असल्याचे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डाॅ. समीर कटेकर यांनी प्लेसमेंट विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे बोलताना म्हणाले, इंजिनिअरिंगचे पहिले पाच वर्ष खुप महत्वाचे असतात. हि पाच वर्षे तुम्हास जीवनातील एका यशाच्या शिखरावर पोहोचवण्यास महत्वाची असल्याचे मत प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले.
मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील कुमारी रूपाली रामचंद्र चौधरी हि विद्यार्थिनी या वर्षांच्या बेस्ट आऊट गोईंग स्टुडंट ची मानकरी ठरली आहे. तिचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सह मान्यवरांच्या हस्ते सन्मानपञ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी हरीप्रिया कुलकर्णी व विश्वेश्वरी कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार मेसा प्रतिनिधी संदिप क्षीरसागर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.