लातूर प्रतिनिधी
मा.जान्हवी अंबुलगे यांच्या १५ एप्रिल वाढ दिवसानिमित्त "व्यक्त अव्यक्त" या काव्यसंग्रहावर आधारित काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.दिनांक १९ एप्रिल ते २१ एप्रिल २०२३ या रोजी ऑनलाईन काव्य लेखन स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेचे उत्कृष्ट परीक्षण मा.जान्हवी अंबुलगे मॅडम यांनी केले.या स्पर्धेचा निकाल २८ मे २०२३ रोजी झालेल्या कवी संमेलनात जाहीर करण्यात आला व विजेत्यांना व्यक्त अव्यक्त या पुस्तकाची प्रत व सन्मान पत्र देण्यात आले.त्यात प्रथम क्रमांक चारुशीला भांगरे तर
द्वितीय - सरोज गाझरे तसेच
तृतीय - संतोष साळवे व
उत्तेजनार्थ - शितल रानेराजपूत व रुपा धोंगडे असे क्रमांक काढण्यात आले.त्यांना पाठ्यपुस्तकातील कवयित्री चारुता देसाई व हनुमंत चांदगुडे तसेच जान्हवी अंबुलगे मॅडम यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
स्पर्धेचे आयोजन भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष कवी योगेश हरणे , व अजयकुमार वांगे सर यांनी केले होते.यात सुमारे १०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा उद्देश असा आहे की आपल्याच समूहातील लेखकांची प्रकाशित झालेली पुस्तके त्यांची सर्वत्र पोहचावीत व वाचकांना वाचायला मिळावीत हाच एकमेव उद्देश आहे.