पंढरपूर प्रतिनिधी
आषाढी एकादशी (देवशयनी एकादशी) गुरूवार, दि. २९ जून, २०२३ रोजी साजरी होत आहे. या दिवशी पहाटे २.२० वा. मा. मुख्यमंत्री महोदय व मानाचे वारकरी यांचे शुभहस्ते सपत्नीक श्रींची शासकीय महापूजा आयोजित केली आहे. या यात्रा कालावधीत अंदाजे १० ते १२ लाख भाविक येतात. दरवर्षी यात्रेला भाविकांची गर्दी लक्षात घेता, चांगला मुहुर्त व दिवस पाहून पलंग काढून भाविकांना २४ तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते.
श्रीचा त्यानुसार, आज गुरूवार, दि. २०/०७/२०२३ रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला आहे व श्री विठ्ठलास लोड व श्री रूक्मिणी मातेस तक्क्या देण्यात आला आहे.
त्यामुळे काकडा आरती, पोषाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार बंद होवून खालील राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत (दि. ०७/०७/२०२३) सुरू राहतील. दि. २०/०६/२०२३ ते दि. ०७/०७/२०२३ या कालावधीत खालील नित्योपचाराच्या वेळा वगळता २२.१५ तास पदस्पर्श दर्शन व २४ तास मुखदर्शन उपलब्ध असणार आहे.
अ.क्र.नित्योपचार वेळ
नित्यपुजा महानैवेद्य प. ४.०० ते ५.००
०२ स. १०.४५ ते ११.००
०३ गंधाक्षतारा .८.३० ते ९.००
यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखा अधिकारी अनिल पाटील, विभाग प्रमुख संजय कोकीळ आणि पौरोहित्य करणारे मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.