पंढरपूर प्रतिनिधी
राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महाआरोग्य शिबीराचा आषाढी यात्रेसाठी आलेल्या तमाम भाविकांनी लाभ घ्यावा. अशी आवाहन शिवसेना सेनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष महादेव भोसले यांनी केले आहे.
राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून व जिल्ह्याचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या माध्यमातून विविध आरोग्य उपक्रम राबवून सुदृढ आरोग्य राज्याच्या निर्मितीचा प्रयत्न केला गेला आहे. त्याच प्रयत्नातून हजारो रुग्णांची आरोग्य तपासणी शिबिरेही घेण्यात आली आहेत.
आषाढी वारी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य शिबिरामध्ये आत्तापर्यंत पालखी सोहळ्यातील तीन ते चार लाख भाविकांची तपासणी करण्यात आली असून वारी कालावधीमध्ये सुमारे पंधरा ते वीस लाख भाविकांची आरोग्य तपासणी करण्याचा मानस राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत, संपूर्ण सावंत कुटुंबीय, आरोग्य विभाग यांच्यावतीने ठेवण्यात आला आहे. हा मानस पूर्णत्वास नेण्यासाठी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, स्वयंसेवक आदी विशेष परिश्रम घेत आहेत.
वारीमध्ये येणाऱ्या भाविकांना जाग्यावरच उपचार मिळावेत यासाठी मंत्री सावंत यांनी आरोग्य विभागाकडून सूक्ष्म नियोजन करून विविध नाविन्यपूर्ण उपाय योजना राबविल्या आहेत. यामुळे वारीसाठी येणाऱ्या भाविकांची आरोग्याची वारी... आनंदाची वारी होणार आहे.
वारी कालावधीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्याचा जागर प्रथमच होत असून या महाआरोग्य नियोजनाचे आणि आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या आरोग्य संकल्पनेचे भाविकांकडून कौतुक होत असून या आरोग्य शिबिराला उत्तम प्रतिसाद ही मिळत आहे. त्यामुळे आषाढी वारी सोहळ्यामध्ये आलेल्या भाविकांनी महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सेनेचे पंढरपूर तालुका अध्यक्ष महादेव भोसले यांनी केले आहे.