पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथे श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे दर्शन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी घेतले.
यावेळी अभिजित पाटील म्हणाले की लाखो वारकरी बांधवांच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. संतांच्या पालख्यांच्या आगमनाने पवित्र झालेल्या वातावरणात उन्मनी अवस्था प्राप्त झाली. टाळ मृदुंगाच्या गजरात नकळत पाऊले थिरकू लागली.. फुगडी, ध्वज नृत्य, पाऊली, अश्व यांच्यासह भक्तीभावाने मन धुंद होऊन विठ्ठल चरणी लीन झाले.
यावेळी अभिजित पाटील म्हणाले,वाखरी पासून पंढरपूरकडे येत असलेल्या सर्व पालखी दिंडीस भेटी देऊन स्वागत केले. यावेळी माऊलीं- तुकोबासमोर नतमस्तक झालो. वारकरी भगिनी-बांधवांशी संवाद साधला. माऊलीच्या पालखी रथाचे सारथ्य करायला मिळाले. आत्मिक आनंद, सुखाची अनुभूती आली. असे ही पाटील म्हणाले.