सोलापूर प्रतिनिधी
तुळजापूर वेस चौकातील करंजकर विद्यालयात हुशार व होतकरू विद्यार्थी व विद्यर्थिनीना प्रतिष्ठानकडून पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या 172 व्या जयंती निमित्त त्यांचे जेष्ठ नातू महेंद्रजी वारद यांच्या हस्ते व प्रभुराज मैंदर्गीकर (उद्योजक) व प्रतिष्ठानचे संयोजक गणेश चिंचोळी यांच्या प्रमुख उपस्थितीत 50 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले.
सोलापूर येथील 199 वर्ष पूर्ण केलेल्या करंजकर विद्यालय या शाळेचा व पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या समकालीन जन्म दिनानिमित्त हा सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी संस्था सचिव धांनम्मा मधली, मुख्याध्यापिका राजश्री तडकासे, प्रतिष्ठानचे राजू नीला, मल्लिनाथ सोलापूरे, अभिजीत चिडगुंपी, माळगे आप्पा, स्वामी मॅडम, कुंभार मॅडम, हब्बू मॅडम, निंबाळकर सर, साठे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे संयोजक गणेश चिंचोळी यांनी केले सूत्रसंचालन लक्ष्मण पवार यांनी केले तर आभार श्रीदेवी नंद्याळ यांनी मानले.