ईगतपुरी तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडल यामध्ये लाल परी म्हटली की सर्वाना परिचित मात्र याच लाल परीचा १ जून रोजी अमृत महोत्सव म्हणजे ७५ वर्ष पुर्ण झाले मात्र प्रत्येक सरकारच्या काळात दुर्लक्षित राहिलेली हि लाल परी नेहमी तोट्यातच तरीही चालक व वाहक ऊन वारा पाऊस यांची तमा न बाळगता जीवावर उदार होत अविरत सेवा देत आहे.
म्हणून आज अमृत महोत्सवादीनी महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटीचे सचिव भास्करराव गुंजाळ यांच्या हस्ते वाहक, चालक व आगार प्रमुख श्री आवारी यांचा घोटी बस स्थानक येथे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कोणत्या तरी सरकारने आमच्या डोळ्यादेखत तोट्यात असलेली लाल परी नफ्यात आणावी अशी खंत वाहतुक नियंत्रक आवारी यांनी व्यक्त केली याप्रसंगी आमदार हिरामण खोंसकर यांचे पुत्र वामन खोंसकर खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन बाळासाहेब वालझाड़े, चंदू सेठ किरवे, राष्ट्रवादी कांग्रेसचे इगतपुरी शहराध्यक्ष वसीम सैय्यद, महेश शिरोळे, भाऊ पासलकर, सचिन तारगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.