पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
नरेंद्र मोदी विचार मंच भारत या सेवाभावी सामाजिक विचार घेऊन कार्यरत असलेल्या विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र पूर्ण दौरा करून कोणत्याही परिस्थितीचा आढावा करून नरेंद्र मोदी विचार मंच या मंचाच्या नियुक्ती जाहीर केल्या यामध्ये नरेंद्र मोदी विचार मंच पश्चिम महाराष्ट्राच्या संघटन मंत्रीपदी गिरीश आराध्य तसेच सोलापूर जिल्हा युवा संघटन मंत्री म्हणून अजित उर्फ प्रिन्स मोरे यांची निवड पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र महामंत्री सुनील घोडेकर तसेच राष्ट्रीय सचिव केंद्रीय महामंत्री महाराष्ट्र राष्ट्रीय सचिव राजेश जैन यांनी सांगली सोलापूर लातूर पंढरपूर या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर केल्या.
नुकताच नरेंद्र मोदी विचार मंच भारतचे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करून सध्या परिस्थिती सामाजिक परिस्थिती संघटनात्मक बांधणी कार्यकर्त्यांची चर्चा यावर मार्गदर्शन करून पदाधिकाऱ्यांना उपयुक्त सूचना करून नरेंद्र मोदी विचार मंच २०२४ मिशन या संदर्भातही महत्त्वपूर्ण विचार मंचचे कार्यकर्ते यांचे बरोबर होऊन यांना मार्गदर्शन केले.
गिरीश आराध्य हे पंढरपुरातील पूर्वाश्रमीचे भारतीय जनता पार्टी आरएसएसचे कार्यकर्ते असून यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भूषविले होते तसेच त्यांचा सामाजिक कार्यातही सहभाग असून आता त्यांच्यावर पूर्णपणे नरेंद्र मोदी विचार मंच पश्चिम महाराष्ट्राच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नुकतेच घोडेगावकर यांनी मंचच्या पदाधिकाऱ्याच्या निवडीही केले आहेत.
घोडेगावकर याने व राजेश जैन व्यास कुमार रावल यांनी नव्याने नियुक्त झालेल्या नरेंद्र मोदी विचार म्हणजे भारत या विचारमंचचे पदाधिकारी मंचचे काम योग्य वाटते चांगल्या पद्धतीने पार पाडतील असा विश्वास व्यक्त केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.