पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील संत शिरोमणी नामदेव महाराज विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे रविवार दिनांक 4/06/2023 रोजी दुपारी ठीक 4 वाजता संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन चरित्र विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी श्री संत नामदेव महाराज यांचे सतरावे वंशज ह भ प निवृत्ती महाराज माधव नामदास यांचे संत शिरोमणी नामदेव महाराज जीवन चरित्र यावर विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच शिरूर तालुक्यातील समाज बांधवांचे एकत्रीकरण व चर्चासत्राचेही आयोजन करण्यात आले आहे.
तरी सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य नामदेव युवक संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश हिरवे यांनी केले आहे.