पंढरपूर प्रतिनिधी
राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या व विशेषतः तंत्रशिक्षणात लक्षवेधी कामगिरी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर (ता.पंढरपूर) च्या स्वेरीचे यंदाचे वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. शैक्षणिक उपक्रमांसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबवत असताना स्वेरीच्या संशोधन क्षेत्रातील कामगिरीत देखील सातत्य दिसून येत आहे. अशा उपक्रमांचा एक भाग म्हणून गेल्या महिन्यात आयआयटी, मुंबई येथे झालेल्या ‘आकार’ या परिसंवाद सत्रामध्ये स्वेरीच्या तब्बल १६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून आपले संशोधनपर लेख सादर केले.
स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ.माणिक देशमुख व प्रा.चेतन लिमकर यांच्या सहकार्याने सिव्हील इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणारे सायली शिवाजी गावडे, वैभवी विश्वनाथ कांबळे, अंजली बाळासाहेब गपाट, राजनंदिनी संतोषकुमार पवार, ऋतुजा ज्ञानेश्वर शिर्के, हर्षदा विजय देशमुख, अंकिता अशोक जगदाळे, स्नेहल मोहन पाटील, पुनम अंकुश माने, तेजश्री सोमनाथ थिटे, संकेत संभाजी बोडके, सुरज राजेंद्र जव्हेरी, स्वप्निल दशरथ कोल्हे, शुभम गौरीशंकर भागवत, संचित गोविंद जोशी व मानसी पराशर या १६ विद्यार्थ्यांनी या परिसंवादात सहभाग घेतला.
आयआयटी, मुंबई मध्ये १८ व १९ मार्च या दोन दिवशी झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्थापत्य अभियांत्रिकी आधारित परिसंवादाचे (इंटरनॅशनल सिव्हील इंजिनिअरिंग सिम्पोझियम) १५ वे सत्र असलेल्या ‘आकार’ या बुकलेटसाठी विद्यार्थ्यांनी आपले रिसर्च पेपर्स सादर केले. आयआयटी मुंबई येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्यामुळे संशोधनास आणखी गती मिळणार आहे.
संशोधनपर पेपर्स सादर करून या परिषदेमध्ये सहभाग घेतल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख तसेच संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.