पळशी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील पळशी या गावातील नवनाथ गोरख शिंदे यांची महाराष्ट्र पोलीस दलात नुकतीच निवड झाली आहे त्याबद्दल त्याचे कौतुक करून अभिनंदन केले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी घरात अठरा विश्व दारिद्र असताना आणि त्यात भरीस भर आईचे छ्त्र लवकरच हरपल्यामुळे आलेल्या संकटांना सामोरे जात असताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितिवर मात करत जीवनाचा रणगाडा हाकत आहे.
अत्यंत काबाड कष्ट करुन ,रात्रीचा दिवस करुन, मोठ्या जिद्दीने खाकीचे स्वप्न उराशी बाळगून आणि त्याच दृष्टीने प्रयत्न करत असलेला ,शांत आणि सयंमी स्वभावाचा पळशी गावचा सुपुत्र व नवनाथ गोरख शिंदे याची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.