सोलापूर प्रतिनिधी
निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजराजेश्वरी संगीत विद्यालयात अक्षय तृतीयानिमित्त संगीत मैफिल रंगली.
प्रथम संस्थापक अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य विजयकुमार हुल्ले, राजराजेश्वरी माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार,पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, लक्ष्मीकांत त्रिशुले, ज्येष्ठ नागरिक कोल्हापुरे, काशिनाथ पुजारी,मल्लिनाथ पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी राजराजेश्वरी संगीत विद्यालयातील बाल कलाकारांनी ओंकार प्रधान रूप गणेशाचे, लकडी की काठी काठी पे घोडा,देहाची तिजोरी,दर्शना देरे देरे भगवंता,अच्युतम केशवम,खेळ मांडीयेला,रखुमाई रखुमाई,चारु चंद्र की चंचल किरणे,सावली सूरत पे मोहन,हंबरून वासराले चाटती जवा गाय,सजी आयो रे आयो रे, दिल के अरमा आसुओं मे बह गये आदी भावगीत, भक्तीगीत व गझल सादर करून रसिकांची मने जिंकली. स्वराली रॅका, भक्ती पुजारी, धानेश्वरी अचलेरे, प्रचिता श्रावण, रक्षिता सुंकनपल्ली, पूर्वा रेके, लहरीका गोने, साक्षी कुरापाटी, प्रतिभा पाटील, हेमा जुंजा, लावण्या मिसालोलू, कावेरी पगड्याल, वैष्णवी घंटे आदी बालकलाकारासह तबला शिक्षक लिंबाजी सुतार सहभाग घेतले होते. सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बसवराज सावळतोट, श्रीशैल कलशेट्टी, ओम मिस्कीन आदींनी परिश्रम घेतले.