कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्यातील हलकर्णी येथील आरोग्य शिबारात पहिल्या दिवशी ७००० नागरिकांनी घेतला लाभ
हलकर्णी प्रतिनिधी
मुख्यमंत्री वैद्यकीय विभागाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व बीजेपी आयोजित हलकर्णी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराचे उदघाटन कारीमठ हत्तरगीचे गुरूसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ७८ डॉक्टर आणि १२० आरोग्य कर्मचारी आरोग्य शिबीरासाठी उपलब्ध होते शिबिरात २५ प्रकारच्या तपासण्या, चष्मा वाटप, महत्वाचा औषध-गोळ्या आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले.
सुमारे ७००० हुन अधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिराचे नियोजन वैद्यकीय जिल्हाप्रमुख प्रशांत साळुंखे, राज्य संपर्कप्रमुख जितेंद्र सातव, कोल्हापूर शहर प्रमुख कृष्णा लोंढे, महेश भादवनकर, किशोर बेल्लड आदींनी केले आहे.