सोलापूर प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कढून सोडवले आहेत परंतु
जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना
राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी
यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती
राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता
प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा
पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना
अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे
पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे
पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे
खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी
पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण
या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका बजावून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे विक्रम वाघमारे हे गेली अनेक वर्षांपासून साप्ताहिक कार्यसम्राट वृतपत्र चे काम पहात असून त्यांना पत्रकारांच्या प्रश्नाची जाणीव असून पत्रकारांच्या अडचणीत ते नेहमीच धावून जातात युवा व धाडसी पत्रकार म्हणून फलटण तालुका मध्ये त्यांनी आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
त्यांची पत्रकार सुरक्षा समिती फलटण जिल्हा सातारा तालुका अध्यक्ष म्हणून पुन्हा फेर निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सचिव डॉ आशिषकुमार सुना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ सरवदे कार्याध्यक्ष आप्पासाहेब करचे संघटक शंकर माने उपाध्यक्ष बळीराम पवार ठाणे पालघर समन्वयक अरुण ठोंबरे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राम राठोड परभणी जिल्हा अध्यक्ष नागेश नागठाणे जालना जिल्हा अध्यक्ष डॉ निर्मल एस पी सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.