करकंब प्रतिनिधी
श्री सद्गुरू भजलिंग महाराज चंदनउटी अक्षयतृतीया निमित्ताने प्रतिवर्षाप्रमाणे डॉ.श्री जयवंत महाराज बोधले यांची देवाचिये द्वारी या विषयावर सुंदर अशा प्रवचनालेचा सांगता समारोप करकंब व पंचक्रोशीतील भक्त भाविकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला.
अक्षयतृतीयाचा मुहूर्त साधून सद्गुरू भजलिंग महाराजांच्या चांदीच्या मुखवट्याची प्राणप्रतिष्ठा मंत्रघोषात करण्यात आली,तसेच चंदनउटी मी पूजा करुन चंदन उटी वाटप करुन उटीचा सर्व करकंबकर ग्रामस्थांनी लाभ घेतला,
गेले पाच दिवस देवाचिये द्वारी या विषयावर चिंतन करीत असताना देवाचं द्वार कोणत,उभा क्षण म्हणजे काय चारी मुक्ती म्हणजे काय, त्यासाठी सगुण आणि निर्गुण निराकाराची उपासना किती आणि कशी महत्वाची आहे, त्यासाठी ज्ञान आणि नाम किती महत्त्वाचे आहे आणि ते घेतल्याने जळतील पापे जन्मांतरीचे असे विविध दृष्टांत देत असताना महाभारत, रामायण, विचारसागर,चांगदेव पासष्टी, ज्ञानेश्वरी,आणि हरिपाठ या ग्रंथातील अनेक दाखले दिले शेवटी प्रवचन मालेच्या सांगता समारंभात एक तरुणांना उपदेश दिला की तरुणांनो व्यसन करु नका, आयुष्य हे एकदाच येते त्याचा उपयोग पारमार्थिक गोष्टी करा,कर्म चांगले करा, आयुष्य निश्चितच चांगलं बनेल सांगितले,ही प्रवचनाला करकंब व करकंब पंचक्रोशीतील लोकांपर्यंत पोहोचली आहे भविष्यकाळात जिल्ह्यातील भक्त लाभ घेतील अशा आशिर्वाद जयवंत महाराज बोधले यांनी दिला.
ग्रामस्थांच्या मनोगतात अनेकांनी पाच दिवसांच्या या प्रवचन रुपी ज्ञानाचा निश्चितच आम्हांला उपयोग करून घेऊन जीवनाचं सार्थक करु असं सांगितलं,यावेळी सद्गुरू भजलिंग महाराज ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब वास्ते, विद्याताई वास्ते, श्रीनिवास देशपांडे,संजय दुधाणे, चंद्रकांत वास्ते यांचे वतीने डॉ.जयवंत महाराजांचा सत्कार करण्यात आला.
ही प्रवचन माला यशस्वी करण्यासाठी कवींद्र रेडे पाटील, विनायक कुलकर्णी,ज्ञानेश्वर दुधाणे, चंद्रकांत वास्ते, भारत लोहार,माऊली पिसे,संतोष देशमुख,भुषण वास्ते,विश्वास जोशी, मच्छिंद्र जाधव,बप्पा गायकवाड,कुंभार सर, ज्ञानेश्वर शिंदे,पिंटू घाटूळे, यांनी अधिक परिश्रम घेतले.यावेळी परिसरातील कीर्तनकार, प्रवचनकार,व्याख्याते,शिक्षक, डॉक्टर, अनेक भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते