सांगोला प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. डॉ. दत्तात्रय मारुती काळेल यांना सांगोला तालुक्याचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा.दीपकआबा साळुंखे पाटील,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते खिलारवाडी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
खिलारवाडी भूषण पुरस्कार देऊन प्राध्यापक दत्तात्रय काळेल यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा येथोचित गौरव झालेला आहे यामुळे सर्वच घटकातून त्यांचे अभिनंदन होत आहे. प्रा.दत्तात्रय काळेल हे सध्या रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे राज्यशास्त्र विभागांमध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
यावेळी खिलारवाडी गावचे विद्यमान सरपंच मा. शरदरावजी हिप्परकर, उपसरपंच विनायक बागल, माजी सरपंच प्रल्हाद खांडेकर, कृष्णदेव खांडेकर, माजी उपसरपंच चंद्रकांत बागल, सागर इंगोले, माजी विकास सेवा सोसायटी चेअरमन धर्मराज केदार, रामचंद्र शिंदे, ग्रामपंचायत सदस्य नवल गाडे, वैभव खांडेकर माजी व्हा. चेअरमन अजित नरळे,विकास सोसायटी सदस्य दत्तात्रय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य महादेव इंगोले, जालिंदर नरळे, माजी तंटामुक्त अध्यक्ष सुखदेव खांडेकर, सदर कार्यक्रमाचे आयोजक मा. राज उर्फ दाजी सोनाप्पा शिंदे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.