सोलापूर प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणारे यशवंत पवार यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याने पत्रकार सुरक्षा समिती पंढरपूर विभाग संपर्क प्रमुख तथा तेज न्यूज चे संपादक प्रशांत माळवदे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुछ देऊन यशवंत पवार यांचा सोलापूर येथे सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी जेष्ठ पत्रकार झुंजार दैनिक जनता संघर्ष न्यूज चे संपादक सिद्धार्थ भडकुंबे, दैनिक लोकशाही मतदारचे युनूस अत्तार, जेष्ठ पत्रकार इकबाल शेख, युवा पत्रकार नंदू कांबळे माहिती अधिकार कार्यकर्ते बनसोडे सह अन्य उपस्थित होते.