पंढरपूर प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग व इटेल्सा यांच्या संयुक्त विद्यमाने व कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली " सीमॉस व्हि. एल. एस. आय. डिझाइन" या विषयावर दिनांक १८ एप्रिल २०२३ या कालावधीत व्याख्यान आयोजित करण्यात आले होते ,अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी दिली. या व्याख्यानासाठी व्याख्याते म्हणून प्रा. माधूरी काशीद उपस्थित होते.
या प्रोग्रॅम अंतर्गत अंतीम वर्षात शिकणाऱ्या ३० विद्यार्थीं आणि ५ शिक्षकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. या प्रोग्राम मध्ये त्यांना माॅस लेयर, स्टिक डायग्रॅम याची माहिती सांगितली. तसेच डिझाईन रुलस आणि लेआउट बद्दल माहिती दिली. हा प्रोग्रॅम पार पाडण्यासाठी विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी ,प्रा.स्वप्नील टाकळे, अमित करांडे व विदयार्थी प्रतिनिधी म्हणून रुक्मिणी शिर्के यांनी जबाबदारी पार पाडली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले .