फलटण प्रतिनिधी
फलटण बारामती रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहण बाबत आज तातडीची बैठक फलटण तहसीलदार यांचे कार्यालयात पार पडली. यामध्ये अडचणींवर मात करून रेल्वे प्रकल्पाचे काम येत्या जून महिन्यात सुरू करनेबाबत निर्देश देण्यात आले.
यावेळी फलटण तालुक्याचे तहसीलदार श्री. समीर यादव, प्रांत श्री. शिवाजीराव जगताप आणि बारामती तालुक्याचे प्रांत श्री. दादासाहेब कांबळे, रेल्वे विभागाचे अधिकारी श्री. अजय महारा, श्री. सचिन मुंगसे, श्री. योगेंद्र सिंग, श्री. सागर चौधरी, पत्रकार बांधव, भाजप पदाधिकारी तसेच जनसमुदाय मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता.