पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील विवेक वर्धिनी विद्यालयाचे माजी विद्यार्थी दत्तात्रय शिंदे यांची तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये यांच्या हस्ते करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की मला विवेक वर्धिनीतील सर्व शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळेच मी आज स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊन ओझेवाडी सारख्या खेडेगावातून आज हे यश संपादन केले आहे. त्यांनी पुढे सांगितले की मी ज्या ज्या ठिकाणी जाईन त्या त्या ठिकाणी तेथील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी त्यांना सर्वतोपरी मदत करीन व माझे शाळेचे असणारे संबंध कायम जतन करून ठेवीन.
यावेळी मुख्य लिपिक हनुमंत मोरे शिक्षक राजुभाई मुलाणी शिवाजी येडवे, सोमनाथ फडतरे, सतीश भंडारे, युवराज परचंडे, दिलीप रानगट्टे, श्रीकांत चव्हाण, एकनाथ शिंदे, तुकाराम मस्के, सिद्धनाथ खिलारे, शहादअहमद पठाण, शुभम ऐवळे, रुक्मिणी कोळी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते