उदय वाघवणकर - जोगेश्वरी प्रतिनिधी
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील आमदार व माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्या मार्गदर्शनानुसार व महेश पडवळ (शाखा समन्वयक) , परवीन युसूफ दुल्हारे / युसूफ दुल्हारे (उप - शाखाप्रमुख) यांच्या आयोजना खाली दावत -ए - सहरी चे आयोजन २७ व्या पवित्र रोज्या निमित्त ईदगाह मैदान येथे दिनांक - 19 एप्रिल रोजी पहाटे ०३ वाजल्यापासून करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रम मागील १२ वर्षे सातत्याने राबविण्यात येत आहे.आणि सदर सहरी चा लाभ मुस्लिम व हिंदू बांधव सुद्धा घेतात जवळ जवळ ५००० बांधव या सोहळ्यात सहभागी होतात.