उदय वाघवणकर जोगेश्वरी प्रतिनिधी
शनिवार दिनांक - २२ एप्रिल अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर रायगड जिल्हा जोगेश्वरी रहिवासी संघ या संस्थेच्या नूतन समाज मंदिराचे उदघाटन जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.
आमदार रविंद्र वायकर यांच्या आमदार निधीतून हे नूतनीकरण करण्यात आले आहे.यावेळी या संस्थेतर्फे गणेश पूजन, श्री सत्यनारायणाची महापूजा व होमहवन, भंडारा, सुस्वर भजन, स्वर सागर मराठी ऑर्केस्ट्रा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.
या शुभप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.सर्वोदय नगर, प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ, जोगेश्वरी (पुर्व) याठिकाणी सदर कार्यक्रम संपन्न होणार असून विभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.