पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथील ग्रामदैवत सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत सतपाल सोनटक्के सिद्धनाथ केसरीचा मानकरी ठरला. त्यांना सिद्धनाथ चषक व 111000 हजार रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
यात्रेमध्ये 500 रुपये पासून ते 111000 हजार रुपये पर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या. कुस्तीच्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरी पै.रावसाहेब मगर, पै. मारुती माने,पै.भारत झांबरे, पै. शहाजी शेळके, पै.वाघमारे यांनी पंच म्हणून काम पाहिले. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निकाली कुस्त्या पाहण्यासाठी धोंडेवाडी परिसरातील कुस्तीप्रेमींनी गर्दी केली होती.
यात्रा यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले असल्याची माहिती सरपंच बंडू गुरव यांनी दिली.