पोलीस अधीक्षक यांना दिले पत्र
सोलापूर प्रतिनिधी
माजलगाव जिल्हा बीड येथील लोकशाही तंत्र युट्युब चे संपादक राज जहागीरदार यांनी माझलगाव येथील बेकायदेशीर चालणाऱ्या मटका जुगार व्यवसाय विरोधात आपल्या लोकशाही तंत्र या युट्युबवरून बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्या बातमीचा राग मनात धरून दिनांक 13 मार्च 2023 रोजी रात्री 10:45 वाजता पत्रकार राज जहागीरदार आपल्या घरी मोटारसायकल वरून जात असताना माजलगावं येथील अवैध मटका जुगार व्यवसाय करणाऱ्या काही लोकांनी पत्रकार राज जहागीरदार यांचा पाठलाग करून मोटारसायकल खाली पाडून जहागीरदार यांना बेदम मारहाण केली होती या संदर्भात पत्रकार जहागीरदार यांना मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी म्हणून पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी दिनांक 27/3/2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे तक्रार केली होती.
पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या तक्रारी ची मुख्यमंत्री कार्यालय ने गंभीर दखल घेतली असून पत्रकार राज जहागीरदार मारहाण प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे पत्र पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांना दिले आहे.