पळशी प्रतिनिधी
पळशी. ता. पंढरपूर येथील नवनाथ गोरख शिंदे या युवकांची एप्रिल मध्ये झालेल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती मध्ये निवड झालेबद्दल त्याला सन्मानित करण्यात आले.
नव नियुक्त पोलीस नवनाथ शिंदे यास प्रा. अशोक लोखंडे यांचे शुभहस्ते सन्मानित करून सत्कार करण्यात आला.
पळशी गावाला हेवा आणि अभिमान वाटावा असे दैदीप्यमान यश संपादन करून गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवल्याचे प्रतिपादन गावचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील व मा. अजितदादा पवार कनिष्ठ महाविद्यालयचे प्रा. अशोक लोखंडे यांनी केले.
पळशी गावाला राष्ट्रसेवा करण्याची परंपरा सुमारे १० वर्षांपासून आहे. गावाला देशसेवा करण्याचे भाग्य CRPF चे नौजवान लक्ष्मण हणमंत लोखंडे यांच्या रूपाने, दुसरे ARMY चे जवान विजय तातोबा गंगवणे,महाराष्ट्र पोलीस दलातील धनंजय सिताराम आवताडे, दुसरे पोलीस शिपाई नेताजी कुंडलिक साळुंखे यांच्या नंतर नवनाथ ने ही परंपरा कायम ठेवत आपली माता व मातीच्या ऋणात राहून आपल्या गावाचे तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव अजरामर करण्याची जिद्द बाळगली व आपले स्वप्न साकार केले.
यावेळी बोलताना पोलीस पाटील प्रा. अशोक लोखंडे म्हणाले, अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना, अजून एक उणीव म्हणजे आईच्या प्रेमाला अगदी लहानपणापासून पारखं झालेल्या नवनाथने जिद्दीला कष्टाची जोड देऊन स्वप्नाला सत्यात उतरविण्याचे धाडस आपल्यातल्या धमकीने वास्तवात उतरविले.
लहानपणीच मेहनतीच बाळकडू मिळालेल्या नवनाथने आपल्या सर्व गुरुवर्यांच्या मार्गदर्शन व आज्ञत राहून जे शारीरिक, बौद्धीक व माणुसकीचे गुण संपादन केले आहेत ते खरंच वाखानन्याजोगे आहे.
या सन्मान सोहळा निमित्त सर्वांनी त्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी ITBP जवान लक्ष्मण लोखंडे,ग्रामपंचायतचे उपसरपंच अशोक शिंदे, मा. उपसरपंच कांतीलाल माने,मा. व. विद्यार्थी वसतिगृहाचे हणमंत झांबरे सर, सत्यवान केंजळे, दत्ता सुरवसे, सिताराम लोखंडे,सागर तरटे, युवराज शिंदे, वजीर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.