पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील बांधकाम व्यावसायिक संजय येलपले यांचे सुपुत्र सौरभ येलपले हे अहमदनगर येथील विखे पाटील वैद्यकीय महाविद्यालय मधून विशेष श्रेणीत एम.बी.बी.एस.पास झालेबद्दल त्यांचा सत्कार भाजपा वैद्यकीय सेल च्या वतीने करण्यात आला. यावेळी डी.एड. कॉलेज चे प्राचार्य बापुसाहेब मोरे उपस्थित होते.
विध्यार्थीनी शालेय जीवनात इतर कोणत्याही गोष्टींचा विचार न करता आपले ध्येय गाठण्यासाठी अविरत मेहनत घेतली पाहिजे असे मत प्राचार्य मोरे यांनी व्यक्त केले.
वैद्यकीय शिक्षण घेऊन समाजाची सेवा करण्याचे व्रत हाती घेऊन समाजातील रुग्णाची सेवा करण्यासाठी सर्वच क्षेत्रात डॉक्टर नी आजपर्यंत खूप मोठे योगदान दिले आहे, कोरोना काळात डॉक्टर नी आपल्या जीवाची बाजी लावत काम केले आहे,आश्या या पवित्र व्यवसायास काहीजण बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत, आश्या प्रवृत्ती समाजाने दूर सारल्या पाहिजेत असे मत पंढरपूर तालुका भाजपा वैद्यकीय सेल चे अध्यक्ष डॉ.श्रीधर येलमार यांनी व्यक्त केले.
आपण एम.बी.बी.एस. नंतर पुढे उच्च शिक्षण घेऊनच आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू करणार आहे,उच्च शिक्षण घेण्यासाठी मात्र आपणास तज्ज्ञांची गरज भासणार असल्याचे नूतन डॉक्टर सौरभ येलपले यांनी सांगितले.
यावेळी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन चे पोलीस कॉन्स्टेबल वामन येलमार,प्राचार्य बापुसाहेब मोरे,संजय येलपले,प्रतीक्षा येलपले,डॉ.श्रीधर येलमार आदी उपस्थित होते.