पंढरपूर प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर मध्ये ११ एप्रिल २०२३ रोजी महात्मा फुले यांची १९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यात मोलाची कामगिरी करणारे, स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतीकारक आणि थोर विचारवंत, समाजसेवी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती ११ एप्रिल २०२३ रोजी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये साजरी करण्यात आली.
यादरम्यान महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. संपत देशमुख, डाॅ. अल्ताफ मुलाणी, प्रा. नंदकिशोर फुले, प्रा. नामदेव सावंत, प्रा. बाळकृष्ण जगदाळे, प्रा. अविनाश हराळे, प्रा. धनश्री भोसले, प्रा. अनिता शिंदे, प्रा. समाधान माळी, विनायक माळी, संजय बनकर, सिद्धेश्वर लवटे, पांडूरंग परचंडे, योगेश नवले, नवनाथ माळी, बापू माने, दत्तात्रय पवार, गणेश वसेकर आदींनी उपस्थित राहून अभिवादन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.