पंढरपूर प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपूर संचालित विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,पंढरपूर येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक सुनिल विश्वासे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रशालेचे प्राचार्य राजेंद्र पाराध्ये ,वस्तीगृह अधीक्षक अमोल हुंगे,दिलीप रानगट्टे, मल्लिकार्जुन गुरव सर,प्रशालेत सेवक श्री शाहअहमद पठाण,शुभम ऐवळे शुभम, रुक्मिण कोळी,भौरम्मा मलंग व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.