सोलापूर जिल्हयात 4 था क्रमांक
शिंदे उदयराजे सचिन
भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुकयातील भाळवणी येथील रयत शिक्षण संस्थेचे,न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.या विद्यालयाचे एन एम एम एस परीक्षेत घवघवीत यश मिळाले आहे.
एन एम एम एस या परीक्षा निकाल 2023 निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे.यामध्ये एकूण परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थी - 105 परीक्षेत पात्र विद्यार्थी - 69 एन एम एम एस शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी-22 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 14 दोन्ही मिळून -36 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
22 विद्यार्थ्यांना 60000 रू प्रमाणे = 1320000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.तसेच
सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -14
प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे 537600 रू शिष्यवृत्ती मिळणार आहे.एकूण 1857600 रू शिष्यवृत्ती मिळणार आहे.एन एम एम एस शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत.
1) शिंदे उदयराजे सचिन - 141 (जिल्ह्यात 4 था )
2) कोले प्रद्युम्नकुमार हनुमंत -130
3) कबाडे अनिकेत राजेंद्र -127
4) कु . शिंदे पोर्णिमा जयंत- 126
5) निराळी प्रद्युम्न पुरुषोत्तम -120
6) कु .पाटील वैष्णवी संतोष- 117
7) शिंगटे राजवर्धन सुधिर
- 115
8) गाडे जय नवल -114
9) कु . गवळी संस्कृती सतीशकुमार -109
10) जाधव श्रेयश बिभीषण - 109
11) कु .सलगर प्रतीक्षा रामचंद्र- 107
12) माळी श्रेयस कालिदास- 107
13) कु .शिंदे सपना मच्छिंद्र- 104
14) कु . माने वैष्णवी प्रकाश 104
15) कु . शेंडे ऋतुजा सुधाकर - 102
16) लाले अथर्व राजेंद्र -101
17) उबाळे कृष्णा अर्जून - 100
18) मुलाणी कादीर फारूख - 100
19) लिंगे शंभूराजे दत्तात्रय - - 98
20) कु . बोधे योगिता सज्जन - 96
21) कु-काटे योगिता शंकर - 93
22) कु. काळे अमृता तानाजी - 71
या सर्व विद्यार्थ्यांना सर्व विषय शिक्षक व विभागप्रमुख नागटिळक यु.व्ही.यांनी मार्गदर्शन केले.
यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले जात आहे.
तसेच रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील , सचिव विठ्ठल शिवणकर , विभागीय चेअरमन संजीव पाटील , सहसचिव राजेंद्र साळुंखे , उप विभागीय अधिकारी गोडसे , स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन संभाजी शिंदे , सरपंच राजकुमार पाटील ,सर्व स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य ग्रामपंचायत सदस्य ,पालक संघाचे उपाध्यक्ष, प्राचार्य एन एम गायकवाड , व उप प्राचार्य ए एस पिसे व पर्यवेक्षक एस डी रोकडे , भाळवणी व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.