सोलापूर प्रतिनिधी
जनतेच्या तक्रारी, गाऱ्हाणी ऐकण्यासाठी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे मंगळवार दिनांक 02 मे 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू हॉलमध्ये आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.
सोमवार दिनांक 01 मे 2023 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 63 वा वर्धापन दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने माहे मे महिन्यातील जिल्हा स्तरीय लोकशाही दिन मंगळवार दिनांक ०२ में २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या लोकशाही दिनात मागील महिन्यातील प्रलंबित निवेदन व अर्ज, माहिती अधिकार अधि.-२००५ अंतर्गत प्राप्त अर्ज, आपले सरकार पोर्टलवरील प्रलंबित तक्रारीवर केलेली कार्यवाही याबाबत निपटारा करण्यात येणार आहे.तसेच नागरिकांच्या लोकशाही दिनातील अर्जावरही कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.