केसकरवाडी प्रतिनिधी बिरूदेव केंगार
पंढरपूर तालुकयातील केसकरवाडी येथे अवकाळी पावसाला साधारण 8 वाजता सुरुवात झाली. आणि सुमारे 8 वाजून 30 दरम्यान केसकरवाडी येथील माजी पंचायत समिती सदस्य तानाजी अनंता केसकर त्यांच्या घरासमोरल नारळाच्या झाडावरती वीज पडली.
घरासमोर उभे असलेले नारळाचे झाड वीज पडल्यामुळे पेटले आहे .तसेच या विजे मुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
परंतू नारळाचे झाड बऱ्यापैकी जळून खाक झाले आहे तरी सर्वानी आपल्या कुटुंबाची, पाळीव जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन सरपंच रुपाली केसकर यांनी केले आहे.
"सोलापूर जिल्हा"
शनिवार दि. 08 एप्रिल , 2023
सूचना जारी झाल्याची वेळ: 22:00 वाजता (सायंकाळी 010.00वाजता)
वैधता: पुढील ३ ते 4तास
हवामान अंदाज:-
भारतीय हवामान खात्याच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई च्या अंदाजानुसार पुढील ३ ते 4 तासामध्ये,सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह (वाऱ्याचा वेग ताशी 30-40 किलोमीटर) विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
सल्ला:-
शेतकरी बांधवांनी स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्यावी. विजांचा कडकडाट होण्याचा आवाज ऐकण्यास आल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. परिपक्व झालेले पीक काढणी केलेले असल्यास ताडपत्री च्या सहायाने झाकून ठेवावे. जिल्हा कृषि हवामान केंद्र
कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, सोलापूर