भाळवणी प्रतिनिधी
पंढरपुर ग्रामिण 1 उपविभाग अंतर्गत शाखा कार्यालय भाळवणी यांनी घरगुती ,व्यापारी व औद्योगिक ग्राहकांची थकबाकी शून्य (0) केली आहे .
बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता फावडे, सोलापूर मंडळ कार्यालय अधीक्षक अभियंता सांगळे, पंढरपूर प्रभारी कार्यकारी अभियंता भोळे, पंढरपूर ग्रामीण -१ उपकार्यकारी अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी या गावातील घरगुती व्यवसायिक व औद्योगिक क्षेत्रातील थकबाकी शून्य झालेली आहे. सदरची थकबाकी ही सन 2022- 23 या आर्थिक वर्षातील आहे.
यावेळी शाखा अभियंता चांदणे म्हणाले की भाळवणी गावातील घरगुती, व्यवसायिक,ग्रामपंचायत व औद्योगिक वीज वापरणाऱ्या सर्व ग्राहकांनी सहकार्य केल्यामुळेच ही थकबाकी शून्य झाली आहे. त्याबद्दल मी सरपंच,लोकप्रतिनिधी व सर्व वीज ग्राहक,ग्रामस्थांचे आभारी आहे. यापुढेही वीज वितरण कंपनीस सर्वांनी सहकार्य करावे असेही आव्हान यावेळी चांदणे यांनी केले.
हि विशेष कामगिरी करणारे कर्मचारी तानाजी वाघमोडे, प्रशांत लिंगडे, सोमनाथ चौगुले, सुहास माळी, सुहास पाटील, पूजा इंगळे, सुनील लोखंडे, कैलास जमदाडे, शनि पाटोळे, राजाभाऊ शिंदे, रामचंद्र शिंदे, भीमाशंकर कारंडे, राज लिंगे यांनी विशेष परिश्रम घेऊन शून्य बाकी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
त्याबद्दल उपकार्यकारी अभियंता पाटील यांच्या हस्ते शाखा अभियंता दिनेश चांदणे, शाखा अभियंता गायकवाड , नैताम सर्व जनमित्र यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.