मारापुर प्रतिनिधी
मारापुर येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार शुभारंभ ग्रामदैवत श्री खंडेराया चरणी नारळ वाढवून जय मल्हार परिवर्तन विकास आघाडीचे पॅनल प्रमुख व मारापूरचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री.यादव यांनी सोसायटी ही शेतकरी सभासदांचा आर्थिक कणा असते. त्यामुळे या महत्त्वाच्या संस्थेची जबाबदारी योग्य नेतृत्वाच्या हाती असणे गरजेचे आहे यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
या प्रचार शुभारंभ प्रसंगी बिनविरोध आलेल्या नूतन संचालक तुळशीराम माने व भारत सातपुते यांचा सत्कार सभासदांच्या वतीने करण्यात आला. मारापुर गावातील नवयुवकांनी सोसायटीमध्ये परिवर्तन करण्याचा पक्का निर्धार केला आहे.
याप्रसंगी माजी सरपंच भगवान आसबे, उपसरपंच अशोक आसबे, राजकुमार यादव, आबा जानकर , सत्यवान यादव, पिंटू मांडवे, आर्जुन यादव,संतोष गांडूळे,नाथा माने,विक्रम यादव, तुळशीराम आसबे यांच्यासह मारापुर गावातील सोसायटी सभासद व तरुण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.