सोलापूर प्रतिनिधी
गुरूविद्या प्रतिष्ठान वतीने महात्मा बसवेश्वर जयंती निमित्ताने मोफत तायकाॅन्दो, क्रिकेट, फुटबॉल शिबिर रविवारी दिनांक १६/४/२३ सायंकाळी ठीक ०५/३० वाजता संप्पन्न झाला.सुरुवातीस स्वागत व बसवेश्वर प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आणि मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर क्रीडा शिबीराचे उद्घाटक क्रिडा अधिकारी पंढरपूर सत्येन जाधव, श्री बापुसाहेब ढगे माजी नगरसेवक, श्री अशोक पाटील सामाजिक कार्यकर्ते, सौ आशा तात्याराव जाधवर, सौ शशीकला पांडूरंग खमितकर, सौ सरीता संजू कांबळे, श्री शिवभगवान पांडे, श्री रब्बानी शेख संस्थापक सोमशेखर भोगडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सातलिंग शटगार, बसवेश्वर उत्सव समिती अध्यक्षा सौ नमिता थिटे, उपाध्यक्षा सौ राजश्री तडकासे,सचिवा सौ श्रीदेवी यळमेली श्री विजयकुमार भोगडे, श्री दत्तात्रय जामदार, सोलापूर जिल्हा तायकाॅन्दो स्पोर्ट्स काॅन्सिल अध्यक्ष राज श्री मोहन भूमकर अध्यक्ष सोलापूर जिल्हा तायकाॅन्दो स्पोर्ट्स काॅन्सिल, सचिव श्री मंजुर शेख, सहसचिवा कु प्रतिक्षा खंडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होती.विजापूर रोड वॄंदावन सोसायटी कॄष्ण मंदिर जवळ सोलापूर येथे श्री सत्येन जाधव यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी सत्येन जाधव यांनी स्पोर्ट्स विषयी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करून प्रतिष्ठानचे कौतुक केले.
यावेळी श्री बापुसाहेब ढगे, श्री सातलिंग शटगार, श्री पाटील यांचे विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दत्तात्रय जामदार तर आभार प्रदर्शन श्री मोहन भूमकर यांची केले.