दापोली प्रतिनिधी
केळशी नं1 शाळेत आदर्श विद्यार्थी पुरस्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न दिनांक 21/ 4/ 2023 रोजी जि प केंद्रशाळा केळशी नं.1 या शाळेत सन २०२२/२३ या वर्षासाठीचा आदर्श विद्यार्थी पुरस्कार चि. हर्षल अमरसिंग पवार इ. पाचवी यांने पटकाविला आणि आदर्श विद्यार्थ्यांनीचा पुरस्कार कु. कृतिका संजय निवाते इ. ७वी हिने पटकाविला.
हा पुरस्कार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.माळवदे मॅडम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते सदर विद्यार्थ्यांचे केळशी पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.