दापोली प्रतिनिधी
केळशी नं. 1 शाळेत इ. सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न केळशी दिनांक 21/ 4 /2023 रोजी केळशी मधील जि प केंद्र शाळा केळशी नं1 येथील इ. सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.माळवदे या होत्या या कार्यक्रमासाठी सौ. पालशेकर बाई सौ. गुहागरकर बाई सौ. पाटील बाई सौ.तळदेवकर बाई सौ पाईकराव बाई सौ.वर्तक मॅडम आणि कदम सर उपस्थित होते
यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी ते सर्वजण भाऊक झाले यावर्षीचा आदर्श विद्यार्थीनीचा पुरस्कार इ.7वी मधील विद्यार्थिनी कु. कृतिका संजय निवाते हिला प्रदान करण्यात आला याबरोबरच इ.5वी मधील चि. हर्षल अमरसिंग पवार याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ पालशेतकर बाई यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी खाऊ वाटप करण्यात आला व या कार्यक्रमाला विद्यार्थी, सर्व शिक्षक वृंद,पालक उपस्थित होते.