पंढरपूर प्रतिनिधी
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त संस्था सचिववा सौ. सुनेत्राताई पवार. यांचे मार्गदर्शनाखाली श्री .रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पंढरपूर येथे प्रशालेच्या प्राचार्या सौ. गायकवाड एन.व्ही. यांचे शुभहस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व सर्वांनी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्रावर विजय शिंदे म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे सर्वांना प्रेरणादायी असून त्यांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून दिनदलित ,श्रमिक ,गोरगरीब जनतेसाठी विशेष कार्य केले तर शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन शिका संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश देऊन समाज हितासाठी अनेक आंदोलने, सत्याग्रह करून न्याय हक्क मिळवून दिला
यावेळी विद्यार्थ्यांसाठी रांगोळी, निबंध, लेखन, नृत्यविष्कार अशी विविध उपक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये मुलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला तर कु. सृष्टी लोंढे, साक्षी लिगाडे, विजय शिंदे या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी रुक्मिणी बँक चेअरमन सविता लोखंडे यांचे सह प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विभावरी डुबल यांनी केले आभार गणेश डुबल यांनी मानले
तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी माधुरी बोडके, कुमुदिनी सरदार , फरहाना कादरी यांनी विशेष परिश्रम घेतले.