पुणे प्रतिनिधी
सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन न्याय देण्याचा नेहमीच प्रयत्न करणारे जनसामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून मानव सेवा हिच खरी ईश्वर सेवा समजून सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी कल्याणासाठी अविरत पणे काम करणाऱ्या युवा व धाडसी नेतृत्व असणाऱ्या डॉ पराग माणिक येदूर यांची राष्ट्रीय जनमंच पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी नुकतीच पुणे येथे निवड करण्यात आली असून त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष राधाकृष्ण बाचकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे यावेळी प्रदेश अध्यक्ष अविनाश झेंडे उपस्थित होते
जनसामान्य माणसाच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून लढाई करणार
डॉ पराग माणिक येदूर हें मूळचे सोलापूर येथील असून ते व्यवसायाने डॉक्टर असून लहानपणापासून त्यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड आहे तळागाळातील जनसमुदायसाठी डॉ पराग माणिक येदूर नेहमीच प्रशासन दरबारात प्रश्न मांडतात वंचित पिढीत घटकासाठी पराकोटीचा संघर्ष त्यांनी आजपर्यंत केला असून सर्व सामान्य माणसाचे प्रश्न सुटावेत अशी नेहमीच त्यांची अपेक्षा असून सामान्य माणसाच्या हितासाठी ते नेहमीच झगडतात निरपेक्ष सडेतोड आणी निर्भीड स्वभाव असल्यामुळे ते पुण्यातील जनतेमध्ये लोकप्रिय ठरले आहेत सामाजिक शैक्षणिक वैधकीय क्षेत्रात त्यांचा मोठा अभ्यास असून केवळ समाजातील तळागाळातील माणसाचे प्रश्न सुटायला हवेत या साठी त्यांनी राष्ट्रीय जनमंच पक्षात प्रवेश केला असल्याचे आवर्जून सांगितले असून सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे निवडी नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असून जनतेच्या वेगवेगळ्या प्रश्नाबाबत लवकरच महाराष्ट्र चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राज्यातील जनतेचे मूलभूत प्रश्न कानावर घालणार असल्याचे सांगितले आहे डॉ पराग माणिक येदूर यांच्या निवडीने जनसामान्य माणसांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आता सामान्य माणसाला न्याय नक्कीच मिळेल अशी भावना सामान्य माणसामध्ये निर्माण झाली आहे