पंढरपूर प्रतिनिधी
पणुंब्रे वारूण(ता.शिराळा) येथे शिराळा तालुका डोंगरी साहित्य परिषदेचे साहित्य संमेलन संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच संपन्न झाले. त्यामध्ये पंढरपूर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक प्रा.डॉ. वामन जाधव यांच्या साहित्याची आस्वादक समीक्षा या साहित्य ग्रंथाला डोंगरी साहित्य परिषद व शब्दरंग साहित्य मंडळाच्या वतीने देण्यात येणारा डोंगरी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार खासदार धर्यशील माने व सदानंद मोरे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, पुष्पहार, सन्मान पत्र व सन्मान चिन्ह असे पुरस्काचे स्वरूप होते. या वेळी सत्यजित देशमुख, उद्योजक बळीराम पाटील, वसंत पाटील, कवी प्रा. प्रदीप पाटील, तानाजीराव पाटील, रघुराज मेटकरी, स्वागताध्यक्ष हणमंतराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा.डॉ. वामन जाधव यांच्या कथा संग्रह, कादंबऱ्या व समीक्षा ग्रंथाना या आगोदर अनेक पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. हा डोंगरी साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल समाजातील सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.