मायणी प्रतिनिधी
मायणी चांदणी चौक या परिसरामध्ये बँका मोठी बाजारपेठ व चौका जवळ हायस्कूल मेडिकल कॉलेज फार्मसी कॉलेज असल्याने येथे नागरिकांची वास्तव्य मोठ्या प्रमाणात असते या सर्वांचा विचार करता शासन निधीतून सार्वजनिक पाणोई चालू करण्यात आली होती इथे लोकसंख्या पाहता प्रवासी विद्यार्थी व्यापारी रोज 25000 पेक्षा जास्त नागरिक ये जा करत असतात तर मायणी यशवंत बाबा महाराज यात्रा सुरू होत असून लाखो संख्येने भाविक येत असतात आत्ता उन्हाळा चालू असून मायणी मध्ये कुठेही सार्वजनिक पाणपोई नाही निधी कोणी मंजूर केला फोटो कोणाचा आहे याच्यापेक्षा नागरिकांच्या हिताची कामे केलेली चांगली कारण ते शासकीय निधीतून झालेलं काम आहे ही पाणपोई सार्वजनिक ठिकाणी असून ग्रामपंचायत पासून दुर्लक्षित का राहिली हे निंदनीय आहे.
याची दखल घेऊन ग्रामपंचायत ने दोन दिवसात पानपोई चालू करावी अन्यथा शिवसैनिक रस्त्यावर उतरणार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसैनिकांनी सांगितले