माळशिरस प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील मोटेवाडी येथे दिनांक १८/०३/२०२३ रोजी वार-शनिवार रोजी झालेल्या अवकाळी गारपिट पावसामुळे नुकसान झाले आहे.
या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची भेट व प्रत्यक्ष पिक पाहणी शेतावरती जाऊन माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांनी केली.
यावेळी आ.सातपुते यांनी,शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे नुकसान झाले आहे.त्याबाबत काळजी करू नका.सरकारने तातडीने पिकांचे पंचनामे करून घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. राज्य शासनातर्फे लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच सर्व सर्व पिकाची पाहणी करून नुकसान भरपाईचा अहवाल तयार करून शासनास सादर करावा अशी माहिती आ.सातपुते यांनी सांगितली.
यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात व नुकसानग्रस्त शेतकरी बांधव आदी लोक उपस्थित होते