पंढरपूर प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ पंढरपूर महाविद्यालयात बुधवार दिनांक १५ मार्च २०२३ रोजी कॉम्प्युटर सायन्स इंजीनिअरिंग विभागात इन्स्टिट्यूट इन्व्हेशन सेल यांच्या मार्फत विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम सोल्युशन फिट अँड प्रॉडक्ट मार्केट फिट या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. विकास शिंदे महाविद्यालय प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य आणि आय.आय. सी. प्रेसिडेंट डाॅ. स्वानंद कुलकर्णी, कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे हे गुगल मीट द्वारे ऑनलाईन उपस्थित होते.
उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. विकास शिंदे यांनी प्रोजेक्ट बेस लर्निंग बद्दल माहिती दिली तसेच त्यांनी दैनंदिन जीवनातील स्टार्ट ओळखणे व त्यावर सोल्युशन याबद्दल महत्वपूर्ण माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. हे व्याख्यान इंडस्ट्रीज इनोव्हेशन सेल अंतर्गत तृतीय व चतुर्थ वर्षांमधील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी महाविद्यालयातील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला.
या व्याख्यानेचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश येवले व आभार प्रदर्शन प्रदर्शनी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.