पंढरपूर प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य नगरपंचायत नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समितीच्या व फेडरेशनच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी, महानगरपालिका नगरपालिका कर्मचारी यांचा १४ मार्च २०२३ पासून राज्यव्यापी संप चालू आहे आज पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्या वतीने राज्याचे जनरल सेक्रेटरी अँड.सुनिल वाळूजकर संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे अखिल भारतीय मजदूर सफाई काँग्रेस चे अध्यक्ष गुरु दोडिया यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी नगरपरिषदेसमोर थाळी नाद आंदोलन करण्यात आले
यावेळी बोलताना अँड.सुनिल वाळूजकर यांनी सांगितले की, आज मुख्यमंत्री मा एकनाथजी शिंदे साहेब यांनी समन्वय समितीचे राज्याचे अध्यक्ष डॉ डी एल कराड यांना चर्चेसाठी मुंबई येथे बोलवले असून या मीटिंगमध्ये
महाराष्ट्रातील महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत कर्मचारी व राज्य शासकीय कर्मचारी संघटना यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी हंगामी कर्मचारी यांना सेवेत कायम करावे, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार समान कामाला समान वेतन द्यावे व तोपर्यंत किमान वेतन देण्याची कारवाई करावी, सन २०१५ पासून नवीन स्थापन झालेल्या नगरपंचायत मधील उद्घोघोषणे पूर्वीचे व उद्घोघोषणे नंतरचे सर्व कर्मचारी व सफाई कर्मचारी यांचे विनाशर्त विना अट समावेशन करावे. नवीन नगरपंचायतीमधील सफाई कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर करावा, नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी यांना दहा वीस तीस ची आश्वासित प्रगती योजना लागू करावी, अनुकंपाची भरती त्वरित करावी व इतर मागण्या वर चर्चा होणार आहे आज संपाचा तिसरा दिवस आहे शासनाचे वरील मागण्या मान्य होण्याच्या दृष्टीने लक्ष वेधण्यासाठी आज नगरपरिषदेसमोर थाळी नाद आंदोलन करण्यात आले असल्याचे अँड.सुनिल वाळूजकर यांनी सांगितले.
हे थाळी नाद आंदोलन यशस्वी करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे नागनाथ तोडकर उपाध्यक्ष संतोष सर्वगोड, किशोर खिलारे, जयंत पवार,अनिल गोयल, दत्तात्रय चंदनशिवे,प्रीतम येळे,तनुजा सीताप, संभाजी देवकर, धनजी वाघमारे, दिनेश साठे, संजय वायदंडे, महावीर कांबळे, ओंकार वाघमारे, राम सर्वगोड, रमेश पवार,चेतन चव्हाण, शकील देवळे, कविता दंदाडे, विद्या भोरकडे,लता सर्वगोड, हेमा आठवले, रेश्मा चंदनशिवे,रवी दोडीया,राणी गायकवाड, सर्व सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.