पंढरपूर प्रतिनिधी
आज राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी हा अर्थसंकल्प मांडला. आता त्या अर्थसंकल्पाविषयी विविध संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
याच अर्थसंकल्पाचा विरोध करत आज पंढरपूर येथे शिवाजी चौक शिवसेना युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या वतिने गाजर वाटप आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना शिवसेना युवासेनेचे युवा नेते रणजित बागल म्हणाले की, आजचा हा अर्थ संकल्प म्हणजे निव्वळ शेतकरी,युवक,महिला,व्यापारी,उद्योजक यांच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पात मोठे मोठे आकडे दाखवुन कांदा उत्पादक शेतकरी व फळे भाजीपाला उत्पादक शेतकरी यांची झालेली दुर्दशा झाकून टाकण्याचा हा केविलवाणा प्रकार या सरकारकडुन सुरू आहे, याचाच प्रतिकात्मक विरोध म्हणुन हे गाजर वाटप आंदोलन करत आहोत. असे बागल म्हणाले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख रवींद्र मुळे म्हणाले की, या अर्थसंकल्पातून दक्षिण काशी असलेल्या पंढरपूर ला कोणत्याही प्रकारचे विशेष असे काहीच मिळाले नाही, वारीला आशिर्वाद मागणाऱ्या नेत्यांनी देवभुमीला सुध्दा वार्यावर सोडले आहे, याचा निषेध करतो.
यावेळी बोलताना तालुकाप्रमुख संजय घोडके यांनी सरकारवर जोरदार ताशेरे ओढत हे सरकार चुकीच्या वृत्तीचे आहे ते शेतकरी व गोरगरिबांच्या उपयोगाचे नाही अशा सरकारला येत्या काळात जनता धडा शिकवेल अशी भुमिका मांडली.
या अनोख्या आंदोलनाची चर्चा आज पंढरपूर शहरभर पसरली होती, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना गाजर देत शिवसैनिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत अर्थसंकल्पाची जोरदार खिल्ली उडवली..
यावेळी शिवसेना जिल्हाउपप्रमुख सुधीर अभंगराव व युवासेना शहरप्रमुख श्रीनिवास उंपळकर यांच्यासह लंकेश बुराडे,बंडु घोडके,विजय वनारे,तानाजी मोरे,अविनाश वाळके,उमेश काळे,प्रणित पवार,उत्तम कराळे,स्वप्निल गावडे,गौसपाक आत्तार,पप्पू तांबोळी,महेश कांबळे,सुरज कांबळे,संजय पवार,बालाजी कोळी,कल्याण कदम,विशाल डोंगरे,बळीराम देवकाते,शिवाजी कोष्टी,समाधान जगदाळे,पिंटु गायकवाड,बाळासाहेब पवार आदि कार्यकर्त्यांसह महिला आघाडीच्या संगिताताई पवार,मंजुळाताई धोंडमिसे,शरिफा पठाण आदि उपस्थित होत्या.