मुंबई प्रतिनिधी
महामंडळासाठी १० हजार कोटी रुपयांची तरतुद.... यात प्रामुख्याने अहमदनगर येथे राजे यशवंतराव होळकर महामेष महाविद्यालय उभे करणे,मेंढपाळाची संख्येची मोजदाद करणे,मेंढ्यांचा विमा, मेंढ्यासाठी बाईक अँम्बुलन्स,मेंढपाळासाठी गायरान जमिनी उपलब्ध करुन देणे, राज्यातील २० पेक्षा अधिक वनक्षेत्र चराई साठी खुली करणे, कृषी विभागाची पडीक जमीन चराई साठी खुली करणे या महत्वाच्या उपयोजना आखण्यात आल्या आहे. ह्या योजनासाठी आ.गोपिचंद पडळकर यानी आराखडा तयार करुन उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सादर करुन त्यासाठी भरघोस निधीची मंजुरी करुन घेतली. धनगर समाजासाठी जे आदिवासींना ते धनगरांना या योजनेसाठी भरिव अशी तरतुद करण्यात आलेली आहे.
तसेच धनगर समाजातील गाव वाडे जोडण्यासाठी राजे यशवंतराव होळकर ग्रामसडक योजना सुद्धा जाहिर करण्यात आली. यानिमित्ताने आ.गोपिचंद पडळकर यांच्या माध्यमातुन राज्यातील धनगर समाजाला खुप मोठा फायदा होणार असल्याचे दिसुन येते.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री यांनी १० हजार कोटीची योजना जाहिर होताच आ.गोपिचंद पडळकर यांचे राज्यातील महत्त्व अधोरेखित होते.महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतिने खुप खुप धन्यवाद..