पुणे प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार २०२३ गेली ३४ वर्ष अखंडितपणे स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने दरवर्षी यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार दिले जातात.
यावर्षीचा यशवंतराव चव्हाण कला जीवन गौरव पुरस्कार दिग्दर्शक, अभिनेते 'प्रवीण तरडे 'यांना जाहीर झाला असून. रोख २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कारासाठी खालील कवितासंग्रहांची निवड करण्यात आली आहे.
१) वेर विखेर- कवी वर्जेश ईश्वरलाल सोलंकी( वसई)
२) घामाची ओल धरून- कवी आबा पाटील (जत)
३) प्रश्न टांगले आभाळाला- कवी नितीन देशमुख (चांदुर बाजार)
४) कपडे वाळत घालणारी बाई- कवयित्री हर्षदा सुंठणकर( बेळगाव)
प्रत्येकी रोख ११ हजार रुपये व सन्मान चिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
सदर पुरस्कारांचे वितरण दिनांक १२मार्च २०२३रोजी टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे रात्री ९ वाजता होणाऱ्या कवी संमेलनात केले जाणार आहे.
कवी संमेलन
सूत्रसंचालन - रामदास फुटाणे, अशोक नायगावकर
सहभागी कवी- वर्जेश सोलंकी( वसई), प्रभाकर साळेगावकर( माजलगाव), किरण येले( मुंबई), नितीन देशमुख( चांदूर बाजार), आबा पाटील( जत), आबिद शेख( पुसद), हर्षदा सुंठणकर( बेळगाव), गजानन मते( परतवाडा), गोपाल मापारी( बुलढाणा)
संयोजक- रामदास फुटाणे,विजय ढेरे, संजय ढेरे,सचिन जाधव