पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथे आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी अमोल दादा धोत्रे रा. पदमावती झोपडपट्टी पंढरपूर यास पंढरपूर येथील में जिल्हा व सत्र न्यायाधीश तोष्णीवाल यांनी रुपये २५०००/- च्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करणेत आलेला आहे. सदर घटनेची हकीकत अशी की :-
सदर घटनेतील फिर्यादी मंगल सदाशिव धोत्रे यांचे फिर्यादीतील मजकूर पुढीलप्रमाणे " मी वरील ठिकाणी पती, मुलगा विशाल, सूनबाई वैशाली, नात शितल विशाल धोत्रे नातू राजू, यश यांचे समवेत राहवयास मी माझे पती व मुलगा विशाल असे मजूरीचे कामे करून कुटूंबाची उपजिवीका चालवते. माझा मुलगा विशाल याचे लग्न सुमारे 15 वर्षांपूर्वी मौजे नरखेड ता मोहोळ येथील चांगदेव देवकर यांची मुलगी वैशाली हिचेबरोबर रिती रिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. त्यांचा संसार गुण्यागोविंदाने चालू होता. गेल्या श्रावण महिन्यातील नागपंचमी दिवशी मी घरासमोरील अंगणात बसलो असताना माझा मुलगा विशाल हा कामावर जातो म्हणून घरातून निघून गेला होता परंतु त्याची थापी राहिल्याने तो घरी परत आला त्यावेळी त्याची पत्नी वैशाली ही फोनवर बोलत होती.
त्यावेळी मुलगा विशालने वैशालीस विचारले की तु कोणासोबत बोलत आहे त्यावेळी तिने सांगितले की मी भावासोबत बोलत आहे. विशालने तिचा फोन घेवून नंबर पाहिले असता तो नंबर त्याचा मेव्हणा नागेश याचा नसल्याने मुलगा विशालने वैशालीस विचारणा केली त्यावेळी तिने उडवाउडवीचे उत्तर देवून दोघात वादावादी होवून भांडण चालू झाले. त्यावेळी विशालने वैशालीचा फोन जमीनीवर आपटून फोडून टाकला झाले प्रकरणाबाबत वैशालीची आई, भाऊ नागेश, बहिण रेणूका व साधना यांना घरी बोलावून घेवून वैशालीस समजावून सांगितले व वैशालीने कबुल केले की मी येथून पुढे असे करणार नाही असे सांगितले त्यामुळे आम्ही सर्वजण परत आमचे दररोजचे काम करू लागलो व आमची समाजात इज्जत व अब्रू जाईल म्हणून कोणास काही सांगितले नाही परंतु माझी सुन वैशाली हिने काही दिवसानंतर परत अमोल धोत्रे रा. पदमावती झोपडपट्टी पंढरपूर यांचेसोबत गजानन महाराज पार्किंगमध्ये व घरासमोरच मजूरीचे कामावर गेलेनंतर भेटणे व बोलणे चालूच राहिल्याने ते माझा मुलगा विशाल यास माहित झाल्याने मुलगा विशाल व सुन वैशाली याच्यात परत भांडण सुरु झाले त्यामुळे सुन एक दोन वेळा माहेरी निघून गेली होती आम्ही व मुलगा विशाल असे नरखेड येथे जावून सुन वैशालीस घरी पंढरपूर येथे घेवून आलो होतो. दिनांक २४/१२/२०१२ रोजी पहाटे ४.०० वा चे सुमारास माझी सुन वैशाली ही घरात कोणास काहीही न सांगता घरातून निघून गेली मी व मुलगा विशालने तिचा शोधाशोध केला असता ती तिच्या माहेरी नरखेड येथे असल्याची माहिती मिळाली ती माहेरीच असल्याने आम्ही घरीच थांबलो व मुलगा विशाल हा तिस घरी आणणेकरीता दिनांक २७/१२/२०२२ रोजी नरखेड ता मोहोळ येथे गेला त्यावेळी अमोल धोत्रे हाही होता तेथे अमोल धोत्रे मेव्हणा नागेश देवकर, सासू सुरेखा देवकर, मोठी मेव्हणी रेणूका विटकर व लहान मेव्हणी साधना धोत्रे यांनी माझे मुलास म्हणाले आम्ही तुझी बायको पाठवत नाही तु येथून निघून जा असे म्हणून दमदाटी शिवीगाळ व मारहाण करून तुला खल्लास करून टाकू तु येथून नाही गेला तर असे केल्याने माझा मुलगा विशालचा नाईलाज झाल्याने तो त्याच दिवशी तेथून पंढरपूर येथे आला. झाल्या प्रकाराबाबत मुलाने घाबरून जावून तक्रार दिली नव्हती मुलगा विशाल घरी आल्यानंतर मला माझी इनबाई सुरेखा देवकर यानी फोनवर मला म्हणाली की आमची पोरगी काय का करेना तुमचे पोर तुम्ही सांभाळा असे म्हणाली परंतु मुलगा विशाल याने भिती खाल्याने तो घराचे बाहेर येत नव्हता. अमोल धोत्रे मला मारून टाकील असे म्हणून तो घरातच थांबला होता त्याच विचारात व पत्नी वैशाली विशाल धोत्रे, अमोल दाद धोत्रे, सासू सुरेखा चांगदेव देवकर, मेव्हणा नागेश चांगदेव देवकर, मोठी मेव्हणी रेणूका सर्जेराव वीटकर व लहान मेव्हणी साधना धर्मेश धोत्रे नातेवाईक रा नरखेड ता. मोहोळ अमोल धोत्रे रा पदमावती झोपडपट्टी पंढरपूर याचे त्रासाला कंटाळून दिनांक ३१/ १२ / २०२२ रोजी पहाटे ५.३० वा चे पुर्वी मुलगा विशाल सदाशिव धोत्रे याने स्वतःचे मोबाईल व्हीडीओ रेकॉर्डींग करून वरील लोकांच्या त्रासाला कंटाहून आत्महत्या करीत असलेबाबत रेकॉर्ड करून घराचे छताचे लोखंडी पाईपला कपडयाच्या साहाय्याने गळफास लावून घेवून आत्महत्या केली आहे. माझा मुलगा विशालच्या आत्महत्या करणेस भाग पाडणाऱ्या वरील लोकांविरुध्द माझी तक्रार आहे. " वगैरे आशयाची फिर्याद यातील फिर्यादी मंगल सदाशिव धोत्रे हिने शहर पोलीस स्टेशन पंढरपूर येथे गु. र नं ६/ २०२३ जे 'दाखल केलेली आहे.
सदर प्रकरणामध्ये आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम १४३,३०६, ५०४, ५०६, ५०७ अन्वये आरोपी यांचे विरुध्द गुन्हा रजिस्टर नं ६ / २०२३ हा दिनांक १/१/२०२३ रोजी सायंकाळी ९.१६ मिनिटांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल करणेत आला.
आरोपी यांनी जामीन मिळणेसाठी पंढरपूर येथील मे जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळणेसाठी अर्ज दाखल केला. सदर अर्जाच्या सुनावणीचे वेळी अर्जदार आरोपी यांचे वतीने युक्तीवाद करणेत आला. सदरचा युक्तीवाद ग्राहय धरून आरोपी अमोल दादा धोत्रे यास रक्कम रुपये २५०००/- जातमुचलक्यावर जामीन मंजूर करणेत आला.
सदर प्रकरणात अर्जदार आरोपी यांचे वतीने अँड.महेश कसबे,अँड.संदिप कागदे, अँड. काकासो केंगार, यांनी काम पाहिले.