मुद्रकांनी एकसंघ राहणे काळाजी गरज : केसकर
पंढरपूर प्रतिनिधी
२४ फेब्रुवारी हा छपाई तंत्रज्ञान शोधाचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांचा जन्मदिवस 'जागतिक मुद्रण दिन' म्हणून साजरा केला जातो. जागतिक मुद्रण दिनानिमित्ताने पंढरपूर युवा मुद्रक संस्थेच्या वतीने कार्यक्रम साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम ज्येष्ठ मुद्रक अरुण शिरसीकर, ज्येष्ठ मुद्रक दिलीप रसाळ यांचे अध्यक्षतेखाली तर ज्येष्ठ मुद्रिका श्रीमती मानसीताई केसकर यांचे शुभहस्ते, पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
या कार्यक्रम प्रसंगीश्रीमती मानसी केसकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना केसकर म्हणाल्या की, मुद्रकांनी कितीही स्पर्धा असली तरी डगमगु नये. बदलत्या मुद्रण व्यवसायात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन सर्व मुद्रक बांधवांबरोबर एकसंघ राहाणे आता काळाची गरज आहे. मुद्रण हा व्यवसाय चरितार्थ न बनविता एक कला म्हणून पुढे न्यावा. व प्रत्येकांनी एकमेकाशी संलग्न राहून स्पर्धा न करता हा व्यवसाय करावा; अशीच सर्व मुद्रकांची प्रगती व्हावी व असेच उपक्रम राबवावेत असे त्या म्हणाल्या. यावेळी मान्यवर पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी पंढरपूर युवा मुद्रक संस्थेच्या वतीने प्रिंटीग प्रेसच्या मालकांना लकी ड्रॉ द्वारे बक्षिसे देण्यात आली. या बक्षिसात कुलर, टेबल फॅन, नंबरींग मशिन, मोठा स्टेपलर, पट्टी स्टेपलर, की बोर्ड माऊस, पाण्याचे कँड, इस्त्री आदि बक्षीसे देण्यात आली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दत्ता पाटील, उपाध्यक्ष बबन सुरवसे, सचिव रामकृष्ण बिडकर, सहसचिव मकरंद वैद्य, खजिनदार श्रीराम रसाळ, सहखजिनदार संतोष गोंजारी, प्रदीप भोरकर आदिंनी परिश्रम घेतले.
यावेळी पंढरपूरातील सर्व मुद्रक बंधू उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक मंदार केसकर यांनी, तर आभार प्रदर्शन रामकृष्ण बिडकर यांनी केले. सुरुची भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.