जर तुम्हाला खरोखरच सुरक्षित इमारत किंवा वाहन मिळाले नाही, तर पुढील उपायांचा अवलंब करा.
*पुलाखाली उभे राहून वादळ जाण्याची वाट पहा. पुलाच्या लोखंडी तुळ्या कमानींना स्पर्श करू नका, तुमच्या दुचाकीपासून दूर अंतरावर थांबा, शक्यतो कोरड्या जागेवर थांबा, पूल हा स्थापत्य शास्त्रानुसार काळजीपूर्वक बांधलेला असतो. पूल जरी जमिनी पासून उंचावर असला आणि जर त्यावर वीज कोसळली, तरी विजेचा प्रवाह सुरक्षित पणे जमिनीत जातो.
एखादा पूल शोधा, पाण्यापासून दूर राहा. धातूच्या वस्तूंपासून दूर राहा. जर पुलाखाली उभे असाल, तर पाण्याच्या सतत वाढणाऱ्या पातळीची दखल घ्या.
*जर उच्च दाबाच्या तारा रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात असतील तर ज्या उंच मनोऱ्यांना ह्या तारा जोडल्या असतील त्याच्या खूप जवळ जाऊ नका. कमीत कमी ५० फूट अंतर सोडा जर वीज ह्या तारांवर किंवा मनोऱ्यावर कोसळली, तर प्रवाह सुरक्षितपणे या तारातून जमिनीत या अशीच त्यांची रचना असते.
वादळ होत असतांना टाळावीत अशी ठिकाणे व घटना :
" वीज ही नेहमी कोणत्याही ठिकाणच्या सर्वात उंच जागेवर कोसळते. शक्यतो धातूच्या वस्तूवर-जेवढी मोठी धातूची वस्तू तेवढी वीज कोसळण्याची शक्यता जास्त. शक्यतो मोकळ्या जागेवरील किंवा डोंगराच्या उंचावरील भागात असलेल्या एकाकी झाडाचा आसरा घेणे टाळा. झाडाच्या पसरलेल्या फांद्यांखाली उभे राहणे, हे तर जास्तच धोकादायक, सर्वच प्रकारची झाडे धोकादायक असतात. जेवढे झाड उंच, तेवढा धोका अधिक. एकाकी झाडा एवढाच काही झाडांचा छोटा समूहही तेवढाच धोकादायक असतो. झाडाजवळ उभे राहिल्याने झाडावरील विजेचा झोत हा शेवटी जवळ असलेल्या व्यक्तीकडेच येतो.
हे सुध्दा धोकादायक आहे :
*जंगलासभोवती असलेली मोठी झाडे.
मोकळ्या जागेवरील असंरक्षित वास्तू. जसे की- छोटी चर्च, धान्याची कोठारे, वाळलेल्या गवताच्या गंजी, लाकडी गाड्या, निरीक्षण मनोरे, उंचवटे असलेल्या जागा. झोपडया आणि इतर आसरे.
* धातूचे कोणतेही भाग नसलेल्या लाकडाच्या ज्यात पाण्याचे धातूचे नळ आहेत, त्या नळांना स्पर्श करणे टाळा.
* झेंडा उभा करायचा खांब, दुरदर्शन अँटिना, नळ किया धातूची उंची कायम स्वरूपी वास्तु ह्यांच्या जवळ जाऊ नका.
* तळे व पाण्याचे तलाव, बहुधा ही ठिकाणे मदत मिळण्यास दुरापास्त असतात. विशेषतः साठलेल्या पाण्यात तळ्यात तरंगणारी होडी
* गोल्फ कोर्स आणि इतर मैदाने इथे विजा कोसळण्याची शक्यता असते.
* उंच सुळके व पर्वतांच्या कडा, डोंगर माथा, दरीपेक्षा डोंगर माथ्यावर जास्त विजा कोसळतात.
विजेपासून संरक्षित नसलेल्या जागा - कायम स्वरूपी धातूच्या तारांची बनवलेली कुंपणे, आधार घेण्यासाठी लावलेल्या धातूच्या नळ्या व धातूची इतर मोठी बांधकामे, सायकल, मोटरसायकल उघडा ट्रॅक्टर किंवा घोडा चालवणे,धातूची हत्यारे जसे की पहार, कुदळ, कुऱ्हाड, खुपे, छत्र्या, धातूचे झोपाळे, बागेत बसायच्या धातूच्या खुर्चा, बाक इ.
*उघड्या मैदानावर किंवा एखाद्या असंरक्षित लहान खोलीत लोकांचे एकत्र जमणे.
*मोटारीच्या बाहेर उभे राहणे, मोटारीतून बाहेर डोकावणे किंवा मोटारीला रेलून उभे राहणे.
* रोड रोलर किंवा धातूची तत्सम वाहने यांचे सानिध्य टाळावे.
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर