सांगोला प्रतिनिधी
८ मार्च महिला दिन निमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा सांगोला यांच्यावतीने महिला होमगार्ड सांगोला व तहसील कार्यालय सांगोला व सेतू विभाग सांगोला यामधील महिलांचा सत्कार करून त्यांचा गुणगौरव करण्यात आला.
यावेळी ग्राहक पंचायतीचे नागेश जोशी लक्ष्मीकांत लिगाडे डॉक्टर मानस कमलापूरकर डॉक्टर अनिल कांबळे वामनराव देशमुख उत्तमराव चौगुले श्रीकांत देशपांडे गणेश देशपांडे तहसील कर्मचारी बैरागी मॅडम रोहिणी देशपांडे गुरव मॅडम सेतू विभाग होमगार्ड विभाग विमल खटकाळे जया गाडे नंदा सादिकले शितल गायकवाड बायडा लवटे ज्योती माळी दया नांगरे कस्तुरा ईटकर मनीषा सरतापे तसेच झाडबुके महिम कर आणि काशीद साहेब उपस्थित होते.
यावेळेस प्रास्ताविक नागेश जोशी यांनी केले अध्यक्ष लक्ष्मीकांत लिगाडे यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगून देशभक्तीपर गीत सादर केले डॉक्टर अनिल कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले डॉक्टर मानस कमलापूरकर यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्वांचे आभार मानले चहापाण घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.